केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय उद्या कळवणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मुळे पुढे ढकललेल्या आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत सीबीएसई म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आपला निर्णय, उद्या सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहे.
काही पालकांनी मंडळाकडे, १ ते १५ जुलै दरम्यान होणाऱ्या या परीक्षा रद्द करण्याची आणि विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन, तसच प्रात्यक्षिक परीक्षांच्या सरासरीच्या आधारावर गुण देण्याची मागणी केली होती. या मागणी संदर्भात विचार करून लवकरच आपण आपला निर्णय कळवू असं मंडळानं सर्वोच्च न्यायालयाला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.
महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्य सरकारांनी सुद्धा अशीच मागणी, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडे केली होती.