पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यावर भारत आणि चीनमध्ये सहमती
Ekach Dheya
नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या वादग्रस्त भागातून आपापलं सैन्य मागे घेण्यावर चीन आणि भारत यांच्यात सहमती झाली आहे. मोल्डो इथं काल दोन्ही देशांमधे झालेल्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक झाली असं भारतानं म्हटलं आहे.