Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे कोरोना बाधितांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सुविधांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपअधिक्षक डॉ. शंकर जाधव, डॉ. अभय दादेवार, डॉ.यशवंत इंगळे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. किशोर खिलारे, डॉ. विनायक पाटील, डॉ. प्रवीण सोनी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, महानगरपालिकेने कोरोना आटोक्यामध्ये आणण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. महानगरपालिकेतर्फे वॉररूम तयार करण्यात आली असून त्याद्वारे शहरातील रुग्णसंख्या व प्रतिबंधीत क्षेत्र याची माहिती सर्वांना त्वरित मिळू शकते. पावसाळ्यामध्ये रुग्ण वाढीची शक्यता लक्षात घेवून त्या दृष्टीने महानगरपालिकेने विशेष नियोजन केलेले आहे असे सांगून त्यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.

Exit mobile version