पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा
Ekach Dheya
मुंबई : पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. पीककर्ज देण्याबाबत अनेक राष्ट्रीयकृत बँकाविरोधात तक्रारी आल्याचं देशमुख यांनी आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
राज्य सरकारनं विशेष आदेश जारी केल्यानं शेतकऱ्यांना विना अडथळा कर्ज उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं. २२ मार्च ते जून या कालावधीत टाळेबंदी उल्लंघनाच्या १ लाख ३४ हजार गुन्ह्यांची नोंद झाली, यातून ८ कोटी ६४ लाख रुपये दंड वसुल केला, या काळात पोलिसांनी आत्यावश्यक सेवांसाठी ५ लाख ४ हजार ३१ पास उपलब्ध केले, अशी माहितीही त्यांनी दिली.
कैद्याला कोरोनाची लागण झाली तर त्याची माहिती कुटुंबियांना ४८ तासाच्या आत कळवली जाईल आणि प्रकृतीबाबत वेळोवेळी माहिती दिली जाईल असा निर्णय गृह विभागानं घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.