भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं चीनच मत
Ekach Dheya
नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं मत चीननं व्यक्त केलं आहे. मात्र 15 जून ला सरहद्दीवर झालेल्या चकमकीला भारत जबाबदार असल्याची भूमिका कायम ठेवली आहे.
चीनचे परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन आणि संरक्षण मंत्री कर्नल वु कियान या दोघांनीही आपापल्या मंत्रालयाच्या पातळीवर वाटाघाटी सुरु असल्याचं सांगितलं आहे.