राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टपाल विभागातल्या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला
Ekach Dheya
नवी दिल्ली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टपाल विभागातल्या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. राज्यपालांनी हा धनादेश मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरीशचंद्र अग्रवाल यांच्याकडे आज सुपूर्द केला.
या रकमेपैकी २५ हजार रुपयांची रक्कम राज्यपालांनी टपाल विभागाच्या पत्रलेखन स्पर्धेद्वारा मिळवली आहे. ‘बापू आप अमर रहे’ या विषयावर राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला प्रथम पुरस्कार मिळाला. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त ही स्पर्धा नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती.