Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे ग्रामीण जिल्हयातील शस्त्र परवानाधारकांनी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UNI) प्राप्त करुन घ्यावा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयातील 31 जानेवारी 2020 पर्यंतच्या सर्व शस्त्र परवानाधारकांची NDAL-ALIS प्रणालीमध्ये नोंद घेवून UNI क्रमांक प्राप्त करुन घेण्याची मुदत 29 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

पुणे ग्रामीण जिल्हयातील ज्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे व तहसिलदार यांच्याकडून शस्त्र परवाना प्रदान करण्यात आलेला आहे त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय यांच्याकडे 29 जून 2020 पर्यंत त्यांच्या कडील परवान्याची केंद्र शासनाच्या NDAL-ALIS या प्रणालीमध्ये माहिती भरुन घेवून त्याबाबतचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UNI) प्राप्त करुन घ्यावा, तसेच ज्या परवानाधारकांना उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून शस्त्र परवाना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांनी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय यांच्याकडे 29 जून 2020 पर्यंत त्याच्यांकडील परवान्याची केंद्र शासनाच्या NDAL-ALIS याप्रणालीमध्ये भरुन घेवून त्याबाबतचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UNI) प्राप्त करुन घ्यावा,असेही त्यांनी सांगितले.

29 जून 2020 पर्यंत जे शस्त्र परवानाधारक हे त्यांच्या परवान्याची डेटा एन्ट्री करुन त्याबाबतचा UNI क्रमांक प्राप्त करुन घेणार नाहीत, अशा सर्व शस्त्र परवानाधारकांचे परवाने 30 जून 2020 नंतर अवैध समजण्यात येतील, अशी तरतूद भारत सरकारने 3 जानेवारी 2020 रोजीच्या अधिसूचनेमध्ये केली आहे, याची सर्व शस्त्र परवानाधारकांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण जिल्हयातील ज्या अग्नीशस्त्र परवानाधारक यांनी अद्याप यु.आय.एन क्रमांक प्राप्त करुन घेतलेला नाही,अशा परवाना धारकांकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाचे www.pune.nic.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या फॉर्ममध्ये अचुक माहिती भरुन संबधित तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात यावी. फॉर्मसोबत परवान्याची साक्षांकित प्रत, आधार कार्ड, लाईट बील, रेशन कार्ड व पॅन कार्ड इत्यादींच्या छायांकित प्रती जोडण्यात याव्यात, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

Exit mobile version