डीपॉल युनिव्हर्सिटीचे भारतीय विद्यार्थ्यांना आमंत्रण
Ekach Dheya
ग्लोबल गेटवे प्रोग्रामकरिता अर्ज भरण्यासाठी केले निमंत्रित
मुंबई : प्रतिष्ठीत आणि अभ्यासक्रमात काटेकोर तसेच ‘सर्वसमावेशकता, व्यक्तीमत्त्व आणि व्यावसायिकता’ यावर लक्ष केंद्रित असलेल्या डी पॉल युनिव्हर्सिटीने ऑटम क्वार्टर २०२० साठी व्हर्चुअल शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुविधा उपलब्ध केली आहे. हे अभ्यासक्रम विशेषत्वाने भारतीय पदवीधर आणि पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत. स्टडी ग्रुप या अग्रगण्य जागतिक शिक्षण प्रदात्याशी भागीदारी करत विद्यापीठाने हे व्हर्चुअल अभ्यासक्रम ऑटम क्वार्टर २०२० साठी तयार केले आहेत. ग्लोबल गेटवे प्रोग्राम (जीजीपी) करिता अर्ज भरण्याची पदवीधरांसाठी शेवटची तारीख ४ ऑगस्ट २०२० असून पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी १० ऑगस्ट ही आहे.
या सुविधेचा एक भाग म्हणून डीपॉल युनिव्हर्सिटी ग्लोबल गेटवे प्रोग्राममध्ये, जे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या पात्र आहेत, मात्र इंग्रजीतील कौशल्य वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी शैक्षणिक आणि इंग्लिश लर्निंग अभ्यासक्रम या दोन्हींचे संयोजन देण्यात आले आहे. पदवीपूर्व आणि पदवीधर विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे, संवादात्मक आणि आकर्षक अभ्यासक्रम डी पॉल विभागप्रमुखांकडून जे कँपस कोर्सेसमध्ये शिकवले जाते, तसेच शिकवले जाईल.
स्टडी ग्रुपच्या मुख्य कार्यकारी इमा लँकास्टर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, ‘भारतातील बुद्धिवंत विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संधी देणा-या डीपॉलसारख्या अग्रगण्य विद्यापीठासोबत काम करण्याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक वर्षांपासून आम्ही पाहत आहोत की, त्यांच्या विद्यार्थ्यांची अभ्यासात भरभराट होते. विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच त्यांना उत्तम करिअर मिळवून देण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. या प्रोग्रामद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या विद्यार्थ्यांना स्वत:मध्ये तसेच समाजात सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे, अशा विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या आमच्या निश्चयात अधिक भर टाकणार आहे.’