गुगल पे हे सर्व व्यवहार दाद मागण्याच्या दृष्टीनं संरक्षित आहेत – एनपीसीआय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल पे या थर्ड पार्टी अॅपचा वापर करून आर्थिक देवघेवीचे व्यवहार करताना, काही समस्या आल्या, तर त्याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं आखून दिलेलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार दाद मागता येऊ शकते असं, एनपीसीआय स्पष्ट केलं आहे.
गुगल पे हे मान्यता प्रात्प अॅप नाही, त्यामुळे या अॅपचा वापर करून आर्थिक व्यवहार करताना काही समस्या निर्माण झाली तर, त्याविषयी दाद मागण्याच्यादृष्टीनं, असे व्यवहार कायद्यानं संरक्षित नाहीत, अशा आशयाची बातमी समाजमाध्यमांवर फिरत आहे.
मात्र ही बातमी खोटी आहे असं एनपीसीआयनं स्पष्ट केलं आहे. गुगल पे हे मान्यताप्राप्त थर्ड पार्टी अॅप आहे, आणि त्यावरचे सर्व व्यवहार दाद मागण्याच्या दृष्टीनं संरक्षित आहेत असंही एनपीसीआयनं स्पष्ट केलं आहे.