पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Ekach Dheya
विभागात कोरोना बाधित 23 हजार 970 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 23 हजार 970 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 8 हजार 535 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 990 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 496 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 19 हजार 587 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 11 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 532 आहे. कोरोनाबाधित एकूण 680 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 381 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.07 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.47 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 811 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 747, सातारा जिल्ह्यात 29, सोलापूर जिल्ह्यात 10, सांगली जिल्ह्यात 06 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 917 रुग्ण असून 689 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 186 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 350 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 640 आहे. कोरोना बाधित एकूण 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 319 रुग्ण असून 207 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 102 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 797 कोरोना बाधीत रुग्ण असून 712 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 75 आहे. कोरोना बाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 60 हजार 717 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 58 हजार 785 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 932 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 34 हजार 487 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 23 हजार 970 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 27 जून 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )