Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी – शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई (वृत्तसंस्था) : सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. ते आज अमरावतीत चांदुर बाजार इथं कृषी अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलत होते.

सदोष बियाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला. बियाणे अधिनियमाअंतर्गत सदोष बियाणे आढळल्यावर संबंधित कंपनीनं शेतक-यांना नुकसानभरपाई दिली नाही तर कृषी विभागाने त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश कडू यांनी दिले.

Exit mobile version