Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शिक्षण संस्थांनी अध्ययन आणि अध्यापनाकरता ऑनलाईन पर्यायाचा स्वीकार करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थांनी अध्ययन आणि अध्यापनाकरता ऑनलाईन पर्यायाचा स्वीकार करावा, असं मत, राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केलं.

उच्च शिक्षण संस्थामधल्या शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचं काम करणाऱ्या  “अकादमी स्थान फाऊंडेशननं” आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्राचं उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते. “ऑनलाईन अध्यापनाकरता नव-युगातील साधनं”  या वेबीनारचं  ऑनलाईन  उद्घाटन राजभवनात आज झालं.

ऑनलाईन “अध्यापन साधनं” यासह इतर दोन विषयांवरच्या वेबिनारमध्ये देशभरातून सहा हजार शिक्षक सहभागी होत असल्याची माहिती फाउंडेशननं दिली. हे वेबीनार तीन दिवस चालणार आहे.

परिक्षा न देता विद्यार्था उत्तीर्ण  झाले तर त्यांना स्वतःला निश्चितच समाधान लाभणार नाही, ज्याच्याकडे संगणक नाहीत, अशा विद्यार्थ्यांना संगणक पुरवून तंत्रज्ञानानुसार परीक्षा घेणं शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलत असतात. मात्र, अध्यापनात काही शाश्वत गोष्टी आहेत. नव-तंत्रज्ञाचा  स्वीकार करताना, शिक्षणातली मूल्यं जपली पाहिजेत, असंही मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मांडलं.

Exit mobile version