Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एम.एम.आर.डी.ए. नं केली स्थलांतरित कामगारांना पुन्हा बोलवायला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर प्राधिकरणाची पायाभूत सुविधा विकासाची कामं करणाऱ्या अभियांत्रिकी कंपन्यांनी काम पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीनं स्थलांतरित कामगारांना पुन्हा बोलवायला सुरुवात केली आहे.

काम नसल्यामुळे आपापल्या गावी परत गेलेले मजूर पुढच्या महिन्यात पुन्हा रुजू होतील असा अंदाज अधिकृत सूत्रांनी वर्तवला आहे. कोविड पूर्वीच्या काळात एकूण साडेनऊशे प्रकल्पांवर २ लाख २० हजार कामगार काम करत होते. सध्या अंदाजे १ लाख २० हजार रुजू झाले आहेत. असं या अधिकाकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं.

Exit mobile version