अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रामपूर (उत्तर प्रदेश) येथे “सांस्कृतिक सद्भाव मंडप” साठी केली पायाभरणी
Ekach Dheya
या समाज केंद्राचा वापर विविध सामाजिक-आर्थिक -सांस्कृतिक उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन , कोरोनासारख्या आपत्ती दरम्यान मदत कार्यांसाठी आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी केला जाईल
“आत्मनिर्भर भारत” ही “एक भारत श्रेष्ठ भारत” ची हमी आहे: मुख्तार अब्बास नक्वी
नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज रामपूर (उत्तर प्रदेश) येथे सांगितले की “आत्मनिर्भर भारत” ही “एक भारत श्रेष्ठ भारत” ची हमी आहे. नक्वी यांनी रामपूर (उत्तर प्रदेश ) येथील नुमाईश मैदानावर आज “सांस्कृतिक सद्भाव मंडपाची” पायाभरणी केली. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालय 92 कोटी रुपये खर्चून “सांस्कृतिक सद्भाव मंडप” बांधत आहे. या समाज केंद्राचा वापर विविध सामाजिक-आर्थिक -सांस्कृतिक उपक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन , कोरोनासारख्या आपत्तीच्या वेळी मदतकार्य आणि विविध क्रीडा उपक्रमांसाठी केला जाईल.
या प्रसंगी नक्वी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने मागील 6 वर्षात प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (पीएमजेव्हीके) अंतर्गत देशभरातील मागास भागात सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक आणि रोजगाराभिमुख पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. या प्रकल्पांमध्ये 1512 नवीन शाळा इमारती; 22514 अतिरिक्त वर्ग खोल्या; 630 वसतिगृहे; 152 निवासी शाळा, 8820 स्मार्ट क्लास रूम (केंद्रीय विद्यालयांसह ) 32 महाविद्यालये; 94 आयटीआय; 13 पॉलिटेक्निक; 2 नवोदय विद्यालय; 403 बहुउद्देशीय समाज केंद्र “सद्भाव मंडप”; 598 मार्केट शेड्स; 2842 शौचालय आणि पाण्याची सुविधा ; 135 सामायिक सेवा केंद्रे; नोकरदार महिलांसाठी 22 वसतिगृहे; 1717 आरोग्य प्रकल्प; 5 रुग्णालये; 8 हुनर हब; 10 विविध क्रीडा सुविधा, 5956 अंगणवाडी केंद्रे इ.चा समावेश आहे.
नक्वी म्हणाले की, याच प्रमाणे उत्तर प्रदेशातही, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या “समावेशक विकास” च्या वचनबद्धतेमुळे मागील तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. पीएमजेव्हीके अंतर्गत उत्तर प्रदेशात सुमारे 3000 कोटी रुपये खर्चाचे सुमारे 1, 84, 980 प्रकल्प बांधण्यात आले आहेत, ज्यात 282 अतिरिक्त वर्ग खोल्या, 282 अतिरिक्त वर्ग कक्ष, 707 अंगणवाडी केंद्रे, 25 सामायिक सेवा केंद्रे (सीएससी), 31 सद्भाव मंडप (एक सांस्कृतिक सद्भावना मंडप म्हणून ओळखले जाते), 1, 73, 143 सायबरग्राम, 3,865 पेयजल आणि पाणी स्वच्छता प्रकल्प, 27 आरोग्य प्रकल्प (1 युनानी रुग्णालय, 4 होमिओपॅथिक रुग्णालय, 3 आयुर्वेदिक रुग्णालय, 20 पदवी महाविद्यालय, 15 वसतिगृहे (11 मुलींची वसतिगृह), 39 आयटीआय, 02 आयटीआय मध्ये अतिरिक्त काम, 4 पॉलिटेक्निक, 226 कौशल्य प्रशिक्षण, 340 शाळा इमारती, नोकरदार महिलांसाठी 2 वसतिगृहे, 666 शौचालय इत्यादी बांधकाम करण्यात आले आहे.
रामपूरमध्ये एकूण 350 कोटी रुपयांच्या खर्चासह सुमारे 13,276 प्रकल्प बांधण्यात आले आहेत, ज्यात दोन संगणक प्रयोगशाळा , दोन सद्भाव मंडप ( 1 सांस्कृतिक सभा मंडप म्हणून ओळखला जातो ), 6 सामायिक सेवा केंद्रे (सीएससी), 12974 सायबरग्राम, 49 पेयजल आणि पाणी स्वच्छता प्रकल्प (पाण्याच्या टाक्यांसह), 1 पदवी महाविद्यालय, 1 मुलींचे वसतिगृह, 119 शाळा इमारती इ.यात समावेश आहे.
नक्वी म्हणाले की, अर्थव्यवस्था असो, देशाच्या सीमेची सुरक्षा असो, राष्ट्रीय सुरक्षा असो, मोदी सरकारने विकासाचे नवीन विक्रम रचले आहेत. मोदी सरकारने “प्रतिष्ठेसह सशक्तीकरण” प्रति वचनबद्धता पूर्ण केली आहे.
मंत्री पुढे म्हणाले की कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या दूरदर्शी निर्णयांचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. मागील 3 महिन्यांत 80 कोटी लोकांना 25 किलो गहू-तांदूळ आणि 5 किलो डाळी मोफत देण्यात आल्या आहेत, 8 कोटी कुटुंबांना गॅस सिलिंडर देण्यात आले आहेत, 20 कोटी महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. विविध योजनांसाठी डीबीटीच्या माध्यमातून 44 कोटी लोकांच्या बँक खात्यात 60,000 कोटी रुपये वर्ग हस्तांतरित करण्यात आले आहेत, 8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 17, 000 कोटी रुपयांचा किसान सन्मान निधी देण्यात आला आहे. “आत्मनिर्भर भारत” चे 20 लाख कोटीं रुपयांचे पॅकेज हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.
नक्वी म्हणाले की, अल्पसंख्याकांसह प्रत्येक गरजूंच्या “डोळ्यांत आनंद, आयुष्यात भरभराट” सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेने मोदी सरकारने काम केले आहे. जेव्हा आमच्या सरकारने गरीबांना 2 कोटी घरे दिली तेव्हा 31 टक्के लाभार्थी अल्पसंख्याक समाजातील होते. आमच्या सरकारने अनेक दशकांपासून विजेपासून वंचित राहिलेल्या देशातील सुमारे 6 लाख गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करुन दिली आहे. या गावांमध्ये 39 टक्क्यांहून अधिक अल्पसंख्याक समुदायाचे वर्चस्व असलेली गावे आहेत, जी अंधारात होती आणि आता त्यांना वीज पुरविली गेली आहे. आमच्या सरकारने ‘’ किसान सन्मान निधी ’’ अंतर्गत 22 कोटी शेतकर्यांना लाभ प्रदान केला ज्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील 33 टक्के पेक्षा जास्त शेतकरी समाविष्ट आहेत. मोफत गॅस जोडणी देणाऱ्या “उज्ज्वला योजने” च्या 8 कोटीहून अधिक लाभार्थ्यांपैकी सुमारे 37 टक्के लाभार्थी अल्पसंख्यक समुदायातील आहेत. आमच्या सरकारने छोट्या आणि मध्यम उद्योग आणि इतर रोजगारभिमुख आर्थिक उपक्रमांसाठी सुमारे 24 कोटी लोकांना “मुद्रा योजने” अंतर्गत सुलभ कर्ज दिले. आणि 36 टक्के पेक्षा जास्त लाभार्थी अल्पसंख्याक समाजातील आहेत.
नक्वी म्हणाले की, मागील 6 वर्षात अल्पसंख्याक समुदायातील 10 लाखाहून अधिक लोकांना “हुनर हाट”, गरीब नवाज स्वरोजगार योजना ”,“ सीखो और कमाओ ”इत्यादी योजनांच्या माध्यमातून रोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक समाजातील 50 टक्के मुलींसह 3 कोटी 50 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात आली आहेत. .
रामपूर (उत्तर प्रदेश ) मधील नुमाईश मैदानावर “सांस्कृतिक सद्भाव मंडप” (बहुउद्देशीय समाज केंद्र ) साठी पायाभरणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नक्वी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशाची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि समृद्धीसाठी समर्पित आहे. “देश प्रथम ” हे मोदी सरकारचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.