Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सुरक्षेच्या दृष्टीनं वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्य – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्यच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी ते पंढरपूर पायी नेण्याची वारकरी सेवा संघाची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे.

न्यायमूर्ती पी बी वरळे आणि न्यायमूर्ती सुरेन्द्र तावडे यांच्या खंडपीठापुढं व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे याचिकेवर सुनावणी झाली. यंदाची आषाढी वारी सरकारी सुरक्षा तत्वानुसार करणं सर्वांच्या हिताचं आहे, असं स्पष्ट मत न्यायालयानं व्यक्त केलं.

Exit mobile version