Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वस्तू आणि सेवा कर परिपत्रकासंदर्भातले शुद्धीपत्रक

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराचे जीएसटीआर-3 बी प्रपत्र भरताना, नोंदणीकृत काही व्यक्तींनी आयजीएसटी भरतानाच्या सेवा निर्यातीसंदर्भातली तसेच सेझ युनिटसाठी केलेल्या शून्य दर पुरवठ्याची माहिती देताना चूक केली आहे. जीएसटीआर-3 बी च्या 3.1 बी या रकान्याऐवजी ते 3.1 ए या रकान्यात या संदर्भातला तपशील भरण्यात आला. अशा व्यक्ती तांत्रिक कारणास्तव परतावा अर्ज दाखल करु शकल्या नाहीत.

या व्यक्तींना दिलासा देण्यासाठी 1.7.2017 ते 31.3.2018 या काळासाठी अशा व्यक्तींना जीएसटी आरएफडी-01 ए द्वारे परतावा अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  जीएसटीआर-3 बी च्या तक्त्यातल्या 3.1 ए, 3.1 बी, 3.1 सी मधली रक्कम परताव्यासाठी दावा केलेल्या रकमेपेक्षा मोठी असता कामा नये. अशा व्यक्तीचे कॉमन पोर्टलवर परतावा मागण्यासाठी अर्ज करु शकतात. 45/19/2018-जीएसटी या 30.5.2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात हे स्पष्ट करण्यात आले आहे.

Exit mobile version