Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत-चीन देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधल्या चर्चेची तिसरी फेरी सध्या सुरू आहे. कमांडर स्तरावरची ही बैठक मोल्डो-चुशूल सीमेवर, भारतीय चौकीत होत आहे. भारताचं प्रतिनिधित्व, लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग करत असून, चीनचं प्रतिनिधित्व मेजर जनरल लिन लुई करत आहेत.

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी, २२ जूनला झालेल्या बैठकीत, दोन्ही देशांनी आपापलं सैन्यं मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी  करण्याबाबतच्या प्रक्रियेवर, या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा  आहे.

Exit mobile version