Site icon साप्ताहिक एकच ध्येय

टिकटॉकसह ५९ चिनी अँपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची राष्ट्रीय एकात्मता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सुरक्षितता, तसच सार्वजनिक व्यवस्थेला अपायकारक ठरणाऱ्या ५९ मोबाईल ॲप्स वर सरकारनं बंदी घातली आहे. यामध्ये टिक टॉक, शेअर इट, यू सी ब्राऊजर, कॅम स्कॅनर,फोटो वंडर, व्ही मेट, व्हायरस क्लिनर अशा अॅप्सचा समावेश आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागानं, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत अधिकारांचा वापर करत, ही कारवाई केली आहे. १३० कोटी भारतीयांच्या गोपनीयतेबाबत माहितीचा गैरवापर करुन, ही अॅप्स भारताबाहेर असणाऱ्या सर्व्हरवर अनधिकृतपणे ही माहिती गुप्तपणे हस्तांतरित करत असल्याच्या तक्रारी, माहिती तंत्रज्ञान मंत्रालया कडे आल्या होत्या.

या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाइल आणि इंटरनेट उपभोक्त्यांचं हित जपलं जाईल, असं सांगत, गेल्या काही वर्षांमध्ये भारत, तंत्रज्ञानविषयक प्रगती आणि डिजिटल क्षेत्रातल्या प्राथमिक बाजारपेठे बाबत, अग्रगण्य नवसंशोधक म्हणून उदयाला आला आहे, असही सरकारनं स्पष्टं केलं आहे.

Exit mobile version