पिंपरी : प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये महापौर जाधव यांनी केले असून सोमवारी ‘ग’ प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसेविका मनिषा पवार, सविता खुळे, सुनीता तापकीर, नगरसेवक संदीप वाघेरे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, निलेश बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले तसेच सर्व विभागांचे संबधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शहर विकासासाठी संबधित विभागाने पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी उपस्थित केलल्या समस्यांचे त्वरीत निराकरण करून त्याचा अहवाल सादर करावा. सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अवैध नळजोड धारक, मोटारी लावुन पाणी घेणा-यांवर कारवाई करण्यात यावी. जुन्या पाण्याच्या पाईपलाइन काढून टाकुन सुव्यवस्थित नवीन पाईप लाइन टाकवी.
मच्छर, डुक्करे, भटकी कुत्री, रस्तावरील मोकाट जनावरे यांचा बंदोबस्त करावा. इमारती मधील झाडांच्या मुळे वाढली आहेत. ती झाडे महापालिका नियमानुसार काढुन टाकावीत. महापालिकेच्या आरक्षित जागेवर जलशुध्दीकरण केंद्र उभारावे, अशा सूचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या.