JEE आणि NEET परीक्षांबाबत उद्यापर्यंत सूचना सादर कराव्यात – केंद्रसरकार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची JEE आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची NEET या प्रवेशपरीक्षांबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रसरकारनं एक समिती स्थापन केली आहे.
देशात कोविड १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन, परीक्षांबाबत उद्यापर्यंत सूचना सादर कराव्यात, असे निर्देश सरकारनं समितीला दिले आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या ट्विटर संदेशात आज ही माहिती दिली.
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदाच्या JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज हे आदेश दिले.