Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उपकर्मा आयुर्वेदचा सौंदर्य क्षेत्रात प्रवेश

६.५ अब्ज डॉलरच्या सौंदर्य क्षेत्रात प्रमुख स्थान सुरक्षित करण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट

मुंबई : शुद्ध आयुर्वेदिक उत्पादने प्रदान करण्याचा वारसा जपणा-या उपकर्मा आयुर्वेदने आता सौंदर्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. ब्रँडने आयुर्वेदाच्या वैशिष्ट्यांसह चार नवी शुद्ध सौंदर्य उत्पादने नाइट सिरम, ऑनियन हेअर ऑइल, ऑनियन शाम्पू आणि व्हिटॅमिन सी फेस सेरम लॉन्च केली आहेत. या लॉन्चसह ६.५ अब्ज डॉलरच्या सौंदर्य क्षेत्रात प्रमुख स्थान सुरक्षित करण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट आहे.

६९९ ते ११९९ रुपयांच्या किफायती किंमतीत ही उत्पादने उपकर्मा आयुर्वेदच्या अधिकृत वेबसाइटसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकासारख्या प्रमुख पोर्टलवर तसेच देशभरातील १०,००० पेक्षा जास्त दुकानांतील मजबूत ऑफलाइन नेटवर्कमध्ये उपलब्ध होतील.

उपकर्मा आयुर्वेदचे सह संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल कौशिक म्हणाले, “दैनंदिन सौंदर्य साधनांबद्दल लोक सध्या जास्त सजग झाले आहेत. उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ते केवळ चांगल्या पॅकेजिंगकडे न पाहता, सुरक्षित नैसर्गिक घटकांची पूर्तता करणारे आहे की नाही, याचीही खात्री करतात. हे लक्षात घेता आम्ही अतिरिक्त संशोधन व विकास तसेच उद्योगातील तज्ञांमार्फत बाजारात आणायच्या उत्पादनांची निर्मिती व मूल्यांकन प्रक्रियेवर ब्रेनस्टॉर्मिंग सत्र घेतले. काळजीपूर्वक तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट दर्जेदार तसेच नागरी प्रदुषणांपासून मुक्त असलेल्या घटकांचा आम्ही वापर केलेला आहे”.

Exit mobile version