निर्देशांकांनी इंट्रा डे मधील नफा गमावला; पण व्यापार वाढला
Ekach Dheya
निफ्टी ५५.६५ अंकांनी वधारला तर सेन्सेक्स १७७. ७२ टक्क्यांनी वाढला
मुंबई : बेंचमार्क निर्देशांकांनी सलग तिस-या दिवशी सकारात्मक हालचाली दर्शवल्या. निफ्टीने ०.५३% किंवा ५५.६५ अंकांची वाढ घेत १०,६०७.३५ अंकांवर विश्रांती घेतली. अशा प्रकारे तो १० हजारांच्या पातळीच्या पुढेच राहिला. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५०% किंवा १७७.७२ अंकांनी वाढला व तो ३६,०२१.४२ अंकांवर स्थिरावला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की, आज जवळपास १३३३ शेअर्सनी नफा कमावला, १४८ स्थिर राहिले तर १३५९ शेअर्स घसरले. भारती एअरटेल (४.०८%), आयशर मोटर्स (४.१८%), अदानी पोर्ट्स (४.१२%), हिरो मोटोकॉर्प (२.६४%) आणि बजाज ऑटो (१.९३%)हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर जेएसडब्ल्यू स्टील (१.७७%), टाटा स्टील (१.७६%), इंडसइंड बँक (१.४८%), एचडीएफसी बँक (१.२८%) आणि झी एंटरटेनमेंट (१.३५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप ०.५६% नी तर बीएसई स्मॉलकॅप हे ०.४७% नी वधारले. बँक आणि मेटल वगळता सर्व सेक्टर्सनी सकारकात्मक व्यापार दर्शवला.
एचडीएफसी लाइफ: एचडीएफसी लाइफने घोषणा केली की, त्यांचे शेअर्स निफ्टी ५० वर जुलैच्या अखेरच्या दिवशी समाविष्ट होतील. एचडीएफसीचे स्टॉक्स ५.०७% नी वाढून त्यांनी ५७५.७५ रुपयांवर व्यापार केला.
मुथ्थूट फायनान्स: नॉन बँकिंग फर्म मुथ्थूट फायनान्सच्या संचालक मंडळाने स्टॉक्सचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन केल्यानंतर कंपनीचे स्टॉक् ३.१५% नी वाढून ११४३.९० रुपयांवर व्यापार केला.
आरआयएल: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे स्टॉक्स आजच्या व्यापारी सत्रात १.५७% नी वाढून १७८८.०० रुपयांवर पोहोचले. इंटेल ०.३९% भागभांडवल अधिग्रहण करत रिलायन्स जिओमध्ये १८९४.५० रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर हे परिणाम दिसले.
आजच्या व्यापारी सत्रात भारतीय इक्विटी मार्केटमध्ये खरेदी झाल्याने भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ३२ पैशांची बढत घेत तो ७४.६४ रुपयांवर पोहोचला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुुळे तसेच चीन व अमेरिकेदरम्यान तणाव कायम असल्याने सोन्याने फार उत्साही व्यापार केला नाही.
युरोपियन बाजाराने फार व्यापार केला नसला तरी आशियाई शेअर्सनी अमेरिकी वेतनश्रेणीच्या मजबूत आकडेवारीवर विश्वास ठेवला. तथापि, कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे अमेरिकेचा नफा मर्यादित राहिला. नॅसडॅक ०.५२ %, निक्केई २२५ ०.६६%, आणि हँगसेंग ०.९९% नी वाढले. तर दुसरीकडे एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० चे शेअर्स अनुक्रमे ०.८४% आणि ०.९२% नी घसरले.