कोविड-१९ रुग्ण व्यवस्थापनाची सुधारित नियमावली जारी
Ekach Dheya
मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड-१९ रुग्ण व्यवस्थापनाची सुधारित नियमावली जारी केली आहे. यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या आजाराचे गांभीर्यानुसार वेगवेगळे टप्पे आणि लक्षणं मंत्रालयानं नव्यानं सांगितली आहेत.
रेमडेसिविर औषध केवळ ऑक्सीजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांनाच द्यावे, हे औषध लहान मुलं, गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांना तसंच मूत्राशयाचा विकार असलेल्या रुग्णांना अजिबात देऊ नये. हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच दिलं जावं, गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना हायड्रोक्सीक्लोरोक्विन देणं टाळावं.
सौम्य लक्षणं असलेल्या तरीही ऑक्सीजनची गरज वाढत असलेल्या रुग्णांना टॉसिलिजुमाब औषध द्यावं असा सल्ला मंत्रालयानं नव्या नियमावलीत दिला आहे. सध्या या औषधांचा साठा मर्यादित स्वरुपात असल्यामुळे त्यांचा शिफारस केल्यानुसारच रुग्णांसाठी वापर करावा असं मंत्रालयानं सांगितलं आहे.