नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचं केंद्रीय कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या भात पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून ६८ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
कडधान्याची पेरणी ३६ लाख८२ हजार हेक्टर वर होत असून ही वाढ जवळजवळ चौपट आहे. तेलबिया 109 लाख हेक्टरवर आणि ऊस 50 लाख62 हजार हेक्टर वर लावण्यात आला आहे. गेल्यावर्षी सुमारे ३३ लाख हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाली होती.