पिंपरी : महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदे तयार केले असून त्या कायदया अंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम महाराष्ट्र राज्य महिला आयोग करत असून संपूर्ण भारतात महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
असे प्रतिपादन महाराट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गंत महिला बचत गटांसाठीच्या प्रज्वल योजना प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, आयुक्त्त श्रावण हर्डीकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ई प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील नगरसदस्या, स्विनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, प्रियांका बारसे, साधना मळेकर, नगरसदस्य नामदेव ढाके, राजेंद्र गावडे, स्विकृत सदस्य ज्ञानेश्वर थोरात, माजी नगरसदस्य उमा खापरे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीम.रहाटकर म्हणाल्या, राज्य महिला आयोग हे महिलांचे जीवनमान उंचवण्याचे काम करीत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी जे कायदे तयार केले आहेत ते शेवटच्या घटकापर्यत पोहचवायचे आहेत. महिलांचे बचत गट ही खूप चांगली चळवळ आहे. प्रज्वल योजनेत महिलांविषयक कायदे व बतच गटाच्या योजनांची माहिती दिली जाते. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या महिलांविषयक धोरण व योजनांची त्यांनी माहिती दिली.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, सर्व क्षेत्रात महिला सक्षम झाल्या पाहिजेत आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून बचत गटांना विविध घरगुती व्यवसायासाठी अर्थसाहाय्य पुरविले जाते. यामुळे गरीब कुटूबांचे आर्थिक दुष्टया जीवनमान उंचावते.
महापौर राहूल जाधव म्हणाले, पवनाथडीच्या माध्यमातून महिलांनी उत्पादित केलेल्या मालास योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून स्टॉलसची उभारणी केली जाते व प्रोत्साहन दिले जाते.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महनगरपालिकेच्या माध्यमातून बचतगटांच्या उन्न्तीसाठी ५० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करीत आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरात १५ हजारापेंक्षा जास्त बचतगट स्थापन झाले आहेत. आपल्या कुटूबांला संपन्न बनविण्याची क्षमता महिलांमध्ये असते. महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.