देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६० पूर्णांक ८१ शतांश टक्क्यावर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात कोविड-19 मधून बऱ्या झालेल्या व्यक्तींची संख्या सध्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सुमारे 1 लाख 59 हजारने जास्त आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 60 पूर्णांक 81 शतांश टक्के झालं आहे.
गेल्या 24 तासात 14 हजारांहून अधिक कोरोनाबाधित बरे झाले. त्यामुळे देशात कोविडमधून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या आता 4 लाख 9 हजार 82 झाली आहे. तर 2 लाख 44 हजार 814 कोरोनाबाधितांवर देशभर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
दरम्यान, देशभरात काल 24 हजार 850 नवे रुग्ण आढळले तर 613 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 73 हजार 165 झाली असून या आजाराने आतापर्यंत 19 हजार268 जणांचा मृत्य़ू झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
कोविड19 चा सर्वात जास्त फटका बसलेल्या देशांमधे भारताचं स्थान आता चौथं झालं आहे.