राज्य सरकार येत्या आठ दिवसात एन-९५ मास्क आणि सॅनिटायझरची कमाल किंमत नक्की करणार
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एन-९५ मास्क आणि सॅनिटायझरची चढ्या दरानं होणारी विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार येत्या आठ दिवसात मास्क आणि सॅनिटायझरची कमाल किंमत नक्की करणार आहे. यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी चर्चा सुरू असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केंद्र सरकारकडून आलेले मास्कच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संबंधितांना वितरीत केले जात आहेत. त्यामुळे राज्य सरकार अथवा जिल्हा पातळीवर मास्क खरेदीची आवश्यकता नाही. तरीही आपत्कालीन स्थितीत खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जिल्हा पातळीवर जर चढ्या दराने मास्क खरेदी झाली असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करु असंही मंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं.