केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या ऐतिहासिक वास्तु आजपासून सर्वांसाठी खुल्या
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या 3हजार 691 वास्तू आजपासून सर्वांसाठी खुल्या झाल्या आहेत.
केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी सांगितलं की कोविड 19 च्या दृष्टीनं प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या वास्तू खुल्या करण्यात आल्या असून तिथं सुरक्षिततेचे कडक नियम लागू करण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशांव्यतिरिक्त संबंधित राज्यातल्या सरकारांचे नियमही वास्तूंच्या परिसरात लागू होतील. प्रवेश फक्त ई तिकिटांवर दिला जाईल, अभ्यागतांचं शारीरिक तापमान मोजणं, हँड सॅनिटायझरची उपलब्धता, इत्यादी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल.