डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक, डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या एकतेसाठी मुखर्जी यांनी धाडसी प्रयत्न केले तसंच त्यांचे विचार आणि आदर्श देशवासियांना बळ देणारे असल्याचं मोदी यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी देखील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर मुखर्जी हे एक महान बॅरिस्टर, तत्ववेत्ते आणि शिक्षणतज्ञ होते, जम्मू आणि काश्मीर पूर्णपणे भारताशी जोडलेलं राहावं यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले असं नायडु यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील डॉक्टर मुखर्जी यांना एका ट्विट संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे.