महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांत कुठलीही भांडणं नाहीत – बाळासाहेब थोरात
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षात कुठलीही भांडणं नसून सरकार स्थिर आणि मजबूत असल्याचं महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सामील झाल्यासंबंधीच्या प्रश्नावर ते वार्ताहरांना उत्तर देत होते.
राज्याच्या महसुलात घट झाली असतानाही शिक्षण विभागासाठी सहा महागडया गाडया घेतल्याची टीका वस्तूस्थितीला धरून नसल्याचंही थोरात म्हणाले. सहा गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव होता, पण एकाच गाडीच्या खर्चाला मंजुरी मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं.