यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट प्रयोगशाळेचे उद्घाटन
Ekach Dheya
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना संसयीतांची तपासणी (स्वॅब टेस्टींग) मोठया संख्येने करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आरटीपीसीआर, रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट प्रयोगशाळेचे उद्घाटन आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य योगेश बहल, नगरसदस्या सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, डॉ. प्रविण सोनी, पॅथॅलाजिस्ट डॉ. तुषार पाटील, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. नितीन मोकाशी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदि उपस्थित होते. या नविन उपकरणांमुळे मोठया संख्येने रुग्णांची स्वॅब तपासणी कमी वेळात होणार आहे.