Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लॉकडाऊनच्या काळात ५२४ सायबर गुन्हे दाखल ; २७३ जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ६ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  १९९ गुन्हे

■ फेसबुक पोस्ट्स –  २२० गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १२ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ४ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६१ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.

■  १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ ठाणे शहरांतर्गत वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे,त्यामुळे या विभागातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या १८ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात ज्या आयोजकांनी रक्त दान शिबिर आयोजित केले होते,तेच स्वतः कोरोनाग्रस्त आहेत. अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या व्हाट्सअँपद्वारे विविध व्हाट्सअँप ग्रुप्सवर शेअर केली होती.त्यामुळे परिसरात संभ्रम तयार होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

Exit mobile version