नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन- रेल्वे बोर्ड
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे माल वाहतूक वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डानं दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन झाला आहे. हा विभाग नांदेड रेल्वे विभागातल्या कांदा, मका, साखर, सरकी अशा पारंपरिक मालाची वाहतूक वाढवण्यासह अपारंपारिक मालाची वाहतूक वाढवण्याचं काम करणार आहे.
यासाठी एक समिती गठीत केली असून नांदेड कार्यालयाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक या समितीचे संयोजक असतील. रेल्वेमधून माल वाहतूक वाढावी, यासाठी ही समिती व्यापारी, उद्योजक, तसंच संभाव्य ग्राहकांशी सल्ला मसलत करून, त्याची व्यवहार्यता तपासून धोरणात्मक निर्णय घेईल.