कोरोना विषाणूचं हवेतलं अस्तित्व तात्पुरत असल्याचा भारतीय संशोधकांचा दावा
Ekach Dheya
नवी दिल्ली : कोरोना विषाणू हवेतून उडत लोकांना संक्रमित करु शकत नाही, असं शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या हैदराबाद इथल्या जीवकोषीय आणि सूक्ष्म जीवशास्त्र केंद्राचे संचालक राकेश मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना विषाणू हवेमार्फत पसरतो, असा निष्कर्ष काढणारं संशोधन शास्त्रज्ञांनी केलेलं असलं, तरी त्याबद्दल घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही शर्मा यांनी म्हटलं आहे.
२३९ शास्त्रज्ञांच्या या पथकानं जागतिक आरोग्य संघटनेला आपल्या दोन संशोधनांच्या निष्कर्षाबाबत माहिती दिली आहे, त्यात कोरोना विषाणू हवेमार्फत पसरत असल्याचं म्हटलं आहे. मिश्रा यांनी याबाबत खुलासा करताना, या विषाणूचं हवेतलं अस्तित्व तात्पुरतं असल्याचं म्हटलं आहे.