सीबीएसईकडून इयत्ता नववी ते बारावीचा ३० टक्के अभ्यासक्रम वगळला
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी लागू कराव्या लागलेल्या टाळेबंदीमुळे झालेलं शैक्षणिक सत्राचं नुकसान लक्षात घेऊन ९ वी ते १२ वी च्या वर्गांसाठीचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतला आहे.
मनुष्यबळविकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. शैक्षणिक दर्जा कायम राखण्यासाठी अभ्यासक्रमात कपात करताना त्याचा गाभा कायम ठेवण्यात आला आहे, असं निशंक यांनी स्पष्ट केलं.