राजीव गांधी फाउंडेशनसह अन्य दोन संस्थांच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाकडून समितीची स्थापना
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टमधील आर्थिक अनियमिततांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एका आंतर मंत्रीलयीन समितीची स्थापना केली आहे.
या संस्थांकडून आर्थिक अफरातफर विरोधी कायदा, प्राप्तीकर कायदा, विदेशी योगदान कायद्यासह इतर अन्य कायद्यातील तरतुदींचा भंग झाला आहे का, हे या चौकशीदरम्यान तपासले जाणार आहे. सक्तवसुली संचालनालयाचे विशेष संचालक या समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत.