देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आणि सुरक्षित असल्याचं संरक्षण दलाचं प्रतिपादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला सर्व भूभाग भारताच्या अधिपत्याखाली आहे आणि ही जमीन देशाच्या सुरक्षा दलांकडे पूर्णपणे सुरक्षित आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या दलांचे महासंचालक एस एस देसवाल यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
ते आज भोंडसी इथं एका कार्यक्रमानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. पूर्व लडाखमधल्या आताच्या परिस्थितीची चिंता करायचं कारण नसून लडाखची पूर्व, पश्चिम तसच उत्तर अशा सर्वच सीमा अत्यंत सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आपली सुरक्षा दलही सक्रिय आणि समर्पित भावनेनं काम करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आपली सुरक्षा दल जीवावर उदार होउन देशाचं रक्षण करतात असं. गौरवोद्गार देसवाल यांनी काढले आहेत.