Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच काही ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. आतापर्यत सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहेत, यापुढेही लॉकडाऊन कडक पाळून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा, असेही आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

हॉस्पिटल मधील उपलब्ध बेड, रुणवाहिका व आरोग्यविषयक कोणतीही अडचण असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाईन क्रमांक –

1) तपासणीसाठी डॉ. एन. बी.गोखले- 9422534721/8999951242
2) कोविड माहिती – 1075 ( केंद्र),104 ( राज्य) किंवा राज्य आरोग्य विभाग (020-26127394)    3) नॉन कोविड आरोग्य ( कोमार्बिड) तातडीचे ( 24×7) डी एम सी सेल – पुणे म.न.पा. (020-25506800, 25506801, 25506802,25506803)
4) कोविड लक्षणे / गृह विलगीकरण/ रुग्णालय प्रवेशाकरीता (24×7)-डी.एम.सी सेल – पुणे म.न.पा. (020- 25506800, 25506801, 25506802, 25506803 किंवा 020- 25506300 (नायडू रुग्णालय).
5) रुग्णवाहिका प्रसुती रुग्णांकरीता – कमला नेहरु रुग्णालय- (020-25508500, 25508609, सोनवणे रुग्णालय – (020-25506100, 25506108)                                                            6) नॉन कोविड रुग्णांकरीता रुग्णवाहीका – 108 ( शासकीय) किंवा 101 पुणे म.न.पा.
7) कोविड रुग्णवाहिका – 108 ( शासकीय) 8) नॉन कोविड शववाहिका – 101 पुणे म.न.पा 9) कोविड शववाहिका – व्हेईकल डेपो – 020-24503211,24503212

बेड उपलब्धतेकरीता – https://www.divcommpunecovid.com/ccsbedddashboard/hsr इतर तातडीच्या कामाकरीता पुणे म.न.पा.च्या आपत्ती व्यवस्थापन विभाग 020-25506800 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. तसेच गुगल ॲप वरुन कोविड केअर ॲप डाऊनलोड केल्यास बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती जाणून घेवु शकता.

Exit mobile version