Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वाढीव विज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारी दूर केल्याशिवाय वीज जोडणी तोडणार नसल्याचं ऊर्जामंत्र्यांचं स्पष्टीकरण

मुंबई : वाढीव वीज बिलाबाबत ग्राहकांच्या तक्रारी दूर केल्याशिवाय वीज जोडणी कापली जाणार नाही, असं राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी काल मंत्रालयात आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी यांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

तसेच ग्राहकांना विजेचे बिल कशाप्रकारे देण्यात आले याबाबतची माहिती देण्याबाबतचे निर्देशही दिले. एकूण वापराच्या वीज बिलाबाबत आर्थिक सहाय्य करण्यात येईल का याबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती राऊत यांनी दिली.

Exit mobile version