राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत सुमारे ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Ekach Dheya
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यातले ९० पूर्णांक ६६ शतांश टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण ९३ पूर्णांक ८८ शतांश टक्के तर मुलांचं प्रमाण ८८ पूर्णांक ४ शतांश टक्के आहे.
विज्ञान शाखेचे सर्वाधिक ९६ पूर्णांक ९३ शतांश टक्के, वाणिज्य शाखेचे ९१ पूर्णांक २७ शतांश टक्के विद्यार्थी, कला शाखेचे ८२ पूर्णांक ६३ शतांश टक्के विद्यार्थी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ८६ पूर्णांक ७ शतांश टक्के विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. यात ९५ पूर्णांक ८९ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला असून त्यात ८८ पूर्णांक १८ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
पुणे विभागात ९२ पूर्णांक ५० शतांश, नागपूरमध्ये ९१ पूर्णांक ६५ शतांश, मुंबईत ८९ पूर्णांक ३५ शतांश, कोल्हापुरात ९२ पूर्णांक ४२ शतांश, अमरावतीमध्ये ९२ पूर्णांक ९ शतांश, नाशिकमध्ये ८८ पूर्णांक ८७ शतांश, लातूरमध्ये ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
पुन्हा परीक्षा देणाऱ्यांमधले सुमारे ३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.