सर्व राज्यांना त्यांनी व्यक्त केलेल्या गरजेनुसार पुरेसा खत पुरवठा वेळेवर केला जाईल,अशी केंद्र सरकारची ग्वाही
Ekach Dheya
नवी दिल्ली : पेरणीचा हंगाम सुरु होण्याआधी सर्व राज्यांना त्यांनी व्यक्त केलेल्या गरजेनुसार पुरेसा खत पुरवठा वेळेवर केला जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे.
मान्य केलेल्या योजनेनुसार काटेकोरपणे पुरवठा करण्याच्या सूचना खत पुरवठादारांना दिल्या आहेत, त्यानुसार रोज पुरवठा होतोय का यावर खत विभागाचं बारकाईनं लक्ष राहील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
चालू महिन्यात ३ लाख १५ हजार टन युरिया लागेल असा अंदाज होता, त्यामुळे सरकारनं ४ लाख ३४ हजार टन युरिया उपलब्ध होईल याची व्यवस्था केल्याचं यात म्हटलं आहे.