Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाची केंद्र सरकारनं केली घोषणा

नवी दिल्ली : २७ राज्यातल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना सरकारी बँकांनी १५ जुलै पर्यंत १९ हजार ६६९ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे.

आपत्कालीन हमी योजनेअंतर्गत या कर्जांचं वाटप केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाची केंद्र सरकारनं घोषणा केली आहे.

या योजनेचा फायदा जवळपास ४५ लाख सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना होणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

Exit mobile version