कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठीच्या नावनोंदणीला मोठा प्रतिसाद
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या दिल्लीत, भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत केल्या जाणाऱ्या मानवांवरील चाचण्यांसाठी स्वयंसेवकाच्या नावनोंदणीस आजपासून सुरुवात झाली आहे.
आज पहिल्याच दिवशी या नावनोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे 1800 अर्ज आले असल्याचं एम्सच्या डॉ. संजय राय यांनी सांगितलं.
या लसीच्या चाचण्या घेण्याची ज्या संस्थांना मान्यता देण्यात आली आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं दिल्लीच्या एम्सचा समावेश आहे.