Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं. कोविड-19 विरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचं त्यांनी याप्रसंगी सांगितलं. गेल्या अनेक महिन्यांपासूनही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु होते आणि त्याची सकारात्मक चिन्हे दिसून येत असल्याचं हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.

आरंभिक चाचण्यांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नसून एकंदर 14 संस्था या चाचण्यांमध्ये सहभागी आहेत आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे वैज्ञानिक या चाचण्यांमधून मिळणाऱ्या प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवून असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं आहे. दरम्यान दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या समितीने को-व्हाक्सीन लसीची मानवी चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे.

Exit mobile version