दिव्यांगासाठी पीएम केयर्स फंडमधून वाटप करण्याची मागणी
दिव्यांगसाठी सीएसआर अंतर्गत विशेष तरतूदीचा विचार करणे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे रोजगार उद्योग धंदे बंद पडले आहेत. पण ह्या संकटात सगळ्यात जास्त परिणाम झाला आहे तो दिव्यांग लोकांचा…कोविड १९ मुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठे संकट आले असून त्यांना सरकारकडून कोणतेही पॅकेज मिळालेले नाही. म्हणूनच सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट आणि नॅशनल एबिलिम्पिक्स असोसिएशन ऑफ इंडियाने “दृष्टिकोण” नावाखाली पुढाकार घेतला आहे.ह्या अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेत्यांशी सल्लामसलत करून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने योग्य निर्णय घेण्यात येईल.
सार्थक एज्युकेशनल ट्रस्टच्या १२ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये ग्रामीण भागातील दिव्यांगांनी ई-लर्निंग प्लॅटफॉर्मचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी लॅपटॉप वितरण मोहीम सुरू केली गेली आणि लोकांना मोहिमेमध्ये सामील होण्यासाठी आणि दिव्यांगांसाठी जुन्या किंवा नवीन लॅपटॉपची देणगी देण्याचे आवाहन करत आहेत..या उपक्रमाचा फायदा हजारो सक्षम असलेल्या ग्रामीण सशक्तीकरण प्रकल्पांना होईल.
सार्थक एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र अग्रवाल, म्हणाले,”अर्थपूर्ण रोजगार शोधण्यात भारतातील दिव्यांगांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट या सर्वेक्षणानुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये केवळ ०.०५% दिव्यांग कर्मचारी आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी ३% सरकारी संस्थांमध्ये असणे आवश्यक आहे, तर यामध्ये दिव्यांग कर्मचारी केवळ ०.५४ % आहेत. कोरोनामुळे ही टक्केवारी सर्वात खालच्या पातळीवर पोहोचली आहे.लॉकडाऊन दरम्यान, सार्थक एज्युकेशनल ट्रस्ट तातडीने दिव्यांग मुलांसाठी ऑनलाईन समुपदेशन आणि थेरपी सत्र आयोजित करीत आहेत.सार्थकने आतापर्यंत १२०० दिव्यांगांना कौशल्य निर्मिती प्रशिक्षण दिले असून जे आता नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. दिव्यांगांसाठी सुमारे ५० कॉर्पोरेट कस्टमर केयरसाठी भरती करणार आहेत आणि आम्ही त्यांना तिथे ठेवण्याच्या प्रक्रियेत आहोत. दिव्यांगसाठी एक मोबाइल अँपदेखील तयार करण्यात आले आहे, ज्याच्या सहाय्याने त्यांना विविध योजना, रोजगार आणि अन्य सहाय्य संबंधित माहिती मिळू शकेल. दिव्यांग योजना, नोकर्यावरील माहितीवर सहज प्रवेश मिळावा आणि आवश्यकतेनुसार रिअल-टाइम मदत घ्यावी यासाठी मोबाइल अँप देखील विकसित केले जात आहे. याव्यतिरिक्त, सार्थक दिव्यांगांनासाठी ग्लोबल ई-लर्निंग प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि जागतिक पातळीवर दिव्यांग क्षेत्राला सक्षम बनविण्यासाठी आंतरराष्ट्रीय आयोजन सहकार्य करीत आहे.
सीआयआय इंडिया बिझिनेस डिसएबिलिटी नेटवर्क (आयबीडीएन) आणि सार्थक यांच्यात सामंजस्य करारही जाहीर करण्यात आला आहे . याअंतर्गत, वेगळ्या सक्षम असलेल्यांसाठी प्रमाणपत्र प्रशिक्षण अभ्यासक्रम चालविण्यात येतील. तसेच सार्थकने जी 5 ग्रुप देखील बनविला. हा एक समर्पित गट आहे जो दिव्यांगांच्या सबलीकरणाच्या दिशेने कार्य करेल. हा समूह कॉर्पोरेट सीएसआर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या, मीडिया, सीएसओ आणि दिव्यांग यांच्याशी एकत्र काम करेल
नीति आयोगचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार, म्हणाले, “सार्थक यांनी सुरू केलेल्या सामाजिक चळवळीला पाठिंबा देण्यास आम्ही उत्सुक आहोत. नीति आयोग सार्थकच्या वतीने कॉर्पोरेट आणि इतर संस्थांपर्यंत पोहोचून लॅपटॉप मिळविण्याच्या मोहिमेस पाठिंबा देईल ज्यामुळे दिव्यांगांना इ- लअरनिंगद्वारे नवीन कौशल्ये शिकता येतील. २०२१ च्या जनगणनेत दिव्यांगांच्या विशेष गरजा देखील आम्ही विचारात घेऊ.
आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सार्थक यांनी १०५०+ हून अधिक दिव्यांग आणि ४२५+ हून अधिक मुलांच्या पुनर्वसनास मदत केली आहे. सार्थकच्या कौशल्य विकास केंद्रांनी १६००० हून अधिक दिव्यांगांना पर्यटन, संघटित किरकोळ, आयटी आणि आयटीईएस प्रशिक्षण दिले आहे. २१ राज्यांत १००+हून अधिक रोजगार मेळ्यावांचे आयोजनही करण्यात आले आहे. रोजगार मेळावे आणि कौशल्य केंद्रांच्या माध्यमातून १८०००+ हून अधिक दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोविड -१९ मध्ये नोकरी गमावलेल्या दिव्यांगांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन व निधी गोळा करण्यासाठी इम्पेक्ट गुरूवरील “सार्थक्स क्रॉड फंडिंग” मोहिमेवर प्रकाश टाकण्याचे आवाहनही करण्यात आले.
सार्थक एज्युकेशनल ट्रस्टकडून 3 महिने कार्यरत चालणाऱ्या या व्हर्च्युअल सिम्पोजियम सीरीज कोविड-१९ मुळे दिव्यांगांना होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दिशेने कार्य करेल.