आर्युवेद – युनानी उपचाराच्या मदतीने कोरोनावर एकात्मिक औषधोपचार विकसित करता येतील- मुख्यमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद आणि युनानी उपचार तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करून टास्क फोर्सकडे दिल्या, तर त्याच्या मदतीनं एकात्मिक औषधोपचार विकसित करता येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्यातल्या विविध उपचारपद्धतींच्या तज्ञांबरोबर, तसंच वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रतिनिधींशी काल मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास आणि आयुष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ.तात्याराव लहाने यावेळी उपस्थित होते. या संकट काळात आर्युवेद आणि युनानी औषधोपचाराचं महत्व जगाला पटवून देण्याची संधी असल्याचं मुख्यमत्र्यांनी यावेळी सांगितलं.