कोविडच्या पार्श्वभूमीवर एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष केंद्र सरकारकडून शिथिल
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय टी आणि केंद्र सरकारच्या इतर तंत्र-विज्ञान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा निकष, केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिथिल केला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी, ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यामुळे जेईई म्हणजेच संयुक्त प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आता या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत, किमान उत्तीर्ण असणं चालणार असून, याआधीची बारावी परीक्षेत किमान ७५ टक्के गुण आवश्यक असण्याची अट विभागानं सध्या वगळली आहे.