Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशाच्या किनारपट्टी आणि सीमाभागात राष्ट्रीय छात्र सैनिकांची संख्या एक लाखानं वाढवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या किनारपट्टी आणि सीमाभागात राष्ट्रीय छात्र सैनिकांची संख्या एक लाखानं वाढवण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयानं घेतला आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात छात्र सेनेनं केलेल्या उल्लेखनीय कामामुळे हा निर्णय घेतला असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या बातमीत म्हटलं आहे.

आज राज्याच्या राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयात झालेल्या एका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातल्या वसईच्या विद्या विकासिनी शाळेला एनसीसी ध्वजानं सन्मानित करण्यात आलं.

मुंबईत एनसीसी मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात उपमहासंचालक आर एस धालीया यांच्या हस्ते यावेळी या शाळेच्या मुख्याध्यापकांना हा ध्वज देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version