Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शहरातील नागरिकांना उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य

पिंपरी : शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून नागरिकांच्या सुचनांना प्राधान्य देउन प्रभागातील कामे पुर्ण करावीत अशा सुचना महपौर राहूल जाधव यांनी दिल्या.

प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून आज ह प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते.   

या बैठकीला ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य राजू बनसोडे, रोहित काटे, संतोष कांबळे, नगरसदस्या स्वाती काटे, माधवी राजापुरे, सीमा चगुले, उषा ढोरे, सहाय्यक आयुक्त आशा राऊत, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रदिप पुजारी, केशवकुमार फुटाणे, संजय खाबडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले तसेच सर्व विभागांचे संबधीत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.    

यावेळी महापौर राहुल जाधव यांनी ह प्रभागातील सर्व भागांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करणे प्रभागातील राडारोडा उचलणे, अतिक्रमणे हटविणे, अनाधिकृत फलेक्स बॅनर्स काढून टाकणे, नदीतील जलपर्णी काढून टाकून नदी स्वच्छ ठेवणे, मोकाट जनावरे, कुत्री व डुकरे यांचा नारिकांना त्रास होणार नाही, यांकडे प्राधान्याने लक्ष देणे. झोपडपट्टयांमधील ड्रेनेज साफ करून त्यातील गाळ काढून टाकणे, झोपडपट्टयामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे व कासारवाडी येथे वाहतुकीची कोंडी होणार नाही, यासाठी मेट्रो प्रकल्पाचे कामकाज लवकरात लवकर करून घेणे. अशाही सुचना महापौर राहूल जाधव यांनी दिल्या.  

Exit mobile version