Site icon साप्ताहिक एकच ध्येय

औषधांचा काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात इंजेक्शनची मागणी आणि उपलब्धता यातल्या तफावतीमुळे काही औषधांचा काळा बाजार होत असल्याच्या वृत्तांवरुन, अन्न आणि औषध प्रशासन यासंदर्भातली पाळंमुळं खणून काढत आहे.

उल्हासनगरमध्ये छापील किंमतीपेक्षा जास्त दरानं, अक्टर्मा या औषधाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर, ठाणे जिल्हा प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं सापळा रचून, एका महिलेला ताब्यात घेतलं.

या महिलेविरुध्द उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, पुढचा तपास सुरु आहे. काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर, अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत चार ठिकाणी कारवाई करत, पंधरा जणांना अटक केली आहे.

Exit mobile version